टाटा मोटर्स नेक्सॉन एसयूव्ही इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये बाजारात आणणार आहे. नेक्सॉन इलेक्ट्रिक ही टाटा मोटर्सची जिपट्रॉन तंत्रज्ञानाने पॉवर्ड एसयूव्ही असून या कारचं जागितक पदार्पण भारतातून होणार आहे.

 
नेक्सॉन इलेक्ट्रिक 16 डिसेंबर 2019 रोजी शोकेस केली गेली. यानंतर 2020 च्या सुरुवातीलाच ही कार भारतात लाँच होईल. जानेवारी ते मार्च दरम्यान ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन समर्पित अशा तंत्रज्ञानासह नेक्सॉन इलेक्ट्रिकची घोषणा केली होती.
 
 
वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनांध्ये टाटा मोटर्सची ही पहिलीच कार असेल. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये हाय व्होल्टेज सिस्टम असेल, ज्यामुळे फक्त फास्ट चार्जिंगच नव्हे, तर आयपी 67 (धूळ आणि पाणी सहन करण्याची क्षमता) यासह मिळणार आहे. नेक्सॉन इलेक्ट्रिक लिथियम आयर्न बॅटरी सिस्टमवर एकदा चार्ज केल्यास 300 किमी चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. टाटा मोटर्स नेक्सॉन इलेक्ट्रिकच्या इंजिन आणि बॅटरीवर आठ वर्षांच्या वॉरंटीची ऑफरही देणार आहे.
 
 
याकारमध्ये इतरही फीचर्स आहेत. मात्र याची कंपनीने अधिकृतपणे माहिती जारी केलेली नाही. लाँचिंगपूर्वी या कारला चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या 13 शहरांमध्ये 85 ठिकाणी चार्जिंग सुविधा आहे. कंपनीकडून मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु आणि हैदराबादमध्ये चार्जर्स पॉईंट लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
 
 
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये सेमी डिजीटल इंस्टुमेंटर असेल, जे टाटा हॅरियरशी मिळतं-जुळतं आहे. नेक्सॉन इलेक्ट्रिकची किंमत 15 ते 17 लाख रुपये (एक्सशोरुम) असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीचा सामना महिंद्राच्या एक्सयूव्ही 300 सोबत होणार आहे, जी सध्या बाजारात येण्याच्या तयारीत आहे.
 

Find out more: