काही दिवसांपुर्वीच मारूती सुझुकीने देशात छोटी एंट्री सेगमेंट एमपीव्ही कार मारूती एस-प्रेसो लाँच केली होती. या कारचे वैशिष्ट्य तिचा यूटिलिटी लूक हे होते. कंपनीने आता वॅगनआर प्रमाणेच एक नवीन कार सुझुकी हस्टलर एसयूव्ही आणली आहे. रेट्रो लूक असणारी सेंकड जनरेशन सुझुकी हस्टलर एसयूव्हीला सध्या केवळ जापानमध्ये लाँच करण्यात आले आहे. या कारमध्ये सुझुकीच्या व्हिलबेसला 35 एमएम अधिक वाढवण्यात आले आहे, जेणेकरून लेगरूम मिळू शकेल.
या कारमध्ये एलईडीसोबत सर्क्युलर हेडलॅम्प्स, टेललाईट्स आणि बंपर देण्यात आले आहे. कारच्या सेंट्रल कंसोलमध्ये मोठा टचस्क्रीन इंफोटेन्मेंट डिस्प्ले, सहज कंट्रोल होणारे स्टेअरिंग व्हिल, डिजिटल डिस्प्लेसोबत नवीन इंस्ट्रूमेंट कंसोल, डॅश माउंडेट गिअर लिव्हर आणि मोठे व्हिलबेस देण्यात आले आहेत.
या एसयूव्हीमध्ये 660सीसीचे पेट्रोल इंजिन मिळेल, जे नॅच्युरल आणि टर्बोचार्ज्डमध्ये येईल. या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये माइल्ड हायब्रिड टेक्नोलॉजी मिळेल, ज्यात अधिक टार्कसाठी खास इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर फीचर मिळेल. याचे नॉन टर्बो व्हेरिएंट 49 एचपीची पॉवर आणि 59 एमएमचा टॉर्क देते.
टर्बो व्हेरिएंट 64 एचपीची पॉवर आणि 114 एनएम टॉर्क देते. यात स्टँडर्ड ट्रांसमिशन सीव्हीटी आणि एग्जॉस्ट गॅस री-सर्क्युलेशन फीचर मिळते, जे जास्त कंप्रेशन देते. ग्लोबल ट्रेंडला लक्षात घेऊन यात आधुनिक ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम, एडप्टिव्ह क्रूज कंट्रोल, कॅमेरा गाइडेट पेडेस्ट्रियन डिटेक्शन सिस्टम,
ट्रॅफिक साइन रिक्गनाइजेशन सिस्टम आणि अपघात रोखण्यासाठी खास फीचर मिळेल. जापानमध्ये 20 जानेवारीपासून हस्टलर एसयूव्हीची विक्री सुरू होईल. या एसयूव्हीची किंमत 1,612,000 येन म्हणजेच 10.5 लाख रुपये आहे.