कार कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही ई केयूव्ही100 लाँच करणार आहे. कंपनी महिंद्रा ई केयूव्ही100 ऑटो एक्स्पो 2020 मध्ये पहिल्यांदा सादर करेल. या एसयूव्हीला 18.5kWh च्या बॅटरीसोबत लाँच केले जाऊ शकते. ही कार 41 पीएस पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करते. सिंगल चार्जमध्ये ही एसयूव्ही 150 ते 180 किमी अंतर पार करेल.
किंमतीबद्दल सांगायचे तर या ई केयूव्ही100 एसयूव्हीची किंमत 9 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. लाँचिंगच्या वेळी ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर पवन गोयंका यांनी सांगितले की, आम्ही ई-केयूव्ही पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत लाँच करणार आहोत. याद्वारे आम्ही शेअर्ड मोबिलिटी सेगमेंटवर जोर देणार आहोत.
महिंद्राची यासोबतच आणखी एक इलेक्ट्रिक कार ई व्हेरिटो देखील लाँच करणार आहे. सोबतच टाटा टिगोर ईव्हीला देखील ही एसयूव्ही टक्कर देईल. ई व्हेरिटोची किंमत 9.12 लाख रुपये आणि टाटा टिगोर ईव्हीची किंमत 9.44 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.