टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरवर नवीन कार टेस्ला मॉडेल-3 चा व्हिडीओ सादर केला आहे. यामध्ये कार रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांशी बोलताना दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी ही कार लोकांना रस्ता देण्यास व बाजूला सरण्यास सांगत आहे.

 

ट्विटमध्ये एलॉन मस्क यांनी म्हटले की, जर तुम्हाला हवे असेल तर टेस्ला लवकरच लोकांशी संवाद साधेल. हे सत्य आहे. हे फीचर लवकरच इलेक्ट्रिक कार्समध्ये पाहायला मिळेल. हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित आहे की ऑडिओ प्लेयवर याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

 

टेस्लाने आपल्या या मॉडेलमध्ये सिक्युरिटी सिस्टम देखील सर्वात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर मस्क यांनी घोषणा केली आहे की, जर एखाद्या व्यक्तीने एआयशी जोडलेले टेस्ला मॉडेल-3 चे सिस्टम हॅक करून दाखवले तर कंपनी त्या व्यक्तीला 1 मिलियन डॉलर (जवळपास 7.1 कोटी रुपये)  आणि 74 लाख रुपये किंमतीची ही गाडी मोफत देईल. या कारला वेंकुवर येथे मार्चमध्ये होणाऱ्या हॅकर्सच्या स्पर्धेत सादर केले जाईल.

 

टेस्लाने म्हटले आहे की, ही स्पर्धा एकाद्या टेस्टप्रमाणे आहे. ज्यामुळे सिक्युरिटी सिस्टम सुधारण्यास मदत होते.

 

 

Find out more: