भारतात मोटारसायकल कंपनी रॉयल एनफील्डच्या बाईकची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कंपनीने आपल्या 500सीसी च्या तीन बाईक बुलेट 500, क्लासिक 500 आणि थंडरबर्ड 500 ची बुकिंग बंद केली.
कंपनीने तात्पुरते बुकिंग बंद केले आहे. मात्र अद्याप कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 500सीसी मॉडेलच्या कमी विक्रीमुळे कंपनीने असे केल्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यात 500सीसी च्या तुलनेत 350सीसी मॉडेलची अधिक विक्री झाली आहे. कंपनी 350सीसी मॉडेल्सला अधिक बीएस6 इंजिनमध्ये अपग्रेड करेल. त्यानंतर 500सीसी मॉडेलला बीएस6 इंजिनमध्ये लाँच करेल. सध्या कंपनीचे लक्ष केवळ 350सीसी मॉडेलवर आहे.
जर तुम्ही देखील क्लासिक 500 घेण्याचा विचार करत असाल, तर त्वरित बुकिंग करा. कारण स्टॉक असे पर्यंत कंपनी या मॉडेलचे बुकिंग घेत आहे. स्टॉक संपल्यावर कंपनी याचे बुकिंग बंद करेल.
2019 मध्ये 500सीसी मॉडेल्सची एकूण 36,093 बाईक्स विकल्या गेल्या आहेत. तर मागील काही वर्षात कंपनीने 350सीसी सेगमेंटमधील एकूण 7.64 लाख बाईक्सची विक्री केली आहे. रॉयल एनफील्ड 500सीसी मॉडेलमध्ये एअर कूल्ड इंजिनचा वापर करते. हे इंजिन 26.1बीएचपी पॉवर आणि 40.9 एनएम टार्क निर्माण करते. या बाईकची किंमत 1.89 लाख रुपये ते 2.15 लाख रुपये आहे.