टोयोटा आपली लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्युनर नवीन अवतारात आणण्याची तयारी करत आहे. नवीन फॉर्च्युनरला टेस्टिंगच्या वेळी पाहण्यात आले. सध्या बाजारात असलेली फॉर्च्युनर 2016 मध्ये भारतात लाँच झाली होती.
लीक झालेल्या फोटोनुसार, फॉर्च्युनर फेसलिफ्टमध्ये नवीन स्टाइलचे फ्रंट बंपर आण ग्रील आहे. जे कंपनीची लेटेस्ट जेनरेशन RAV4 एसयूव्हीवरून प्रेरित आहे. ग्रीलमध्ये RAV4 एसयूव्हीप्रमाणेच इंसर्ट्स देण्यात आलेले आहे. फ्रंट बंपरमध्ये फॉर्च्युनर टीआरडी स्पोर्टिव्होप्रमाणे फॉग लॅम्प इंसर्ट्स मिळतील.
हेडलॅम्प आणि टेललॅम्पमध्ये बदल असेल, मात्र लाइट्सचा आकार सध्या मॉडेलप्रमाणचे असेल. नवीन फॉर्च्युनरमध्ये बॉडी क्लेंडिंगमध्ये बदल आणि एलॉय व्हिलचे नवीन डिझाईन दिसत आहेत. कंपनी चांगल्या इंफोटेनमेंट सिस्टमसह इंटेरिअरमध्ये बदल करू शकते.
इंजिनबद्दल सांगायचे तर जगभरात फॉर्च्युनर अनेक पेट्रोल व डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात अपडेटेड फॉर्च्युनर मॉडेलमध्ये बीएस6 मानक 2.7 लिटर पेट्रोल आणि 2.8 लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. नवीन फॉर्च्युनर पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात दाखल होऊ शकते.