किआ मोटर्स सेल्टॉसनंतर भारतात आता दुसरी कार किआ कार्निव्हल एमपीव्ही भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ऑटो एक्स्पो 2020 मध्ये कंपनी 7 फेब्रुवारीला ही कार लाँच करेल. ही कार 4 व्हेरिएंटमध्ये लाँच केली जाणार आहे. किआ कार्निव्हल एमपीव्हीच्या एंट्री लेव्हल व्हेरिएंटमध्ये 9 सीट असतील. मिड स्पेक व्हेरिएंटमध्ये 8 सीट असतील व 7 सीटर मॉडेलचे दोन व्हेरिएंट असतील. 7 सीटर व्हेरिएंट प्रिमियम फीचर्ससोबत येईल.
7 सीटर व्हेरिएंटमध्ये पॉवर एडजस्टेबल सीट्स, व्हेंटिलेटेड ड्रायव्हर सीट, पॉवर विंडो, पॉवर्ड टेलगेट, कीलेस एंट्री गो, वायरलेस चार्जिंग, क्रूज कंट्रोल, 3 झोन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल पॅन पॉवर्ड सनरूफ आणि लेदर अपहोस्ट्री या फीचर्सचा समावेश आहे. कार्निव्हलमध्ये 2.2E-VGT डिझेल इंजिन मिळेल. जे 3800 आरपीएमवर 199 बीएचपी पॉवर आणि 1750 ते 2750 आरपीएमवर 441 एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये 8-स्पीड गिअरबॉक्स मिळेल, जे मॅन्युअलसोबतच ऑटोमेटिक ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहेत.
कार्निव्हल एमपीव्हीच्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात एबीएससोबत ईएसपी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिलसाइड असिस्ट, रिअर पार्किंग सेंसर्स, रिअर व्यू कॅमेरा, डस्क सेंसिंग हेडलॅम्प्स, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटो इमर्जेंसी ब्रेक्रिंग आणि फॉरवर्ड कोलिझन वॉर्निंग फीचर्स मिळतात. अन्य फीचर्समध्ये मल्टीझोन क्लायमेट कंट्रोल, स्मार्ट एअर प्यूरिफायर, ड्युअल पॅनल इलेक्ट्रिक पॅनोरेमिक सनरूफ, इलेक्ट्रिकल एडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखे शानदार फीचर्स मिळतील. कारमध्ये हरमन कार्डन प्रिमियम साउंड सिस्टम मिळेल. ज्याद्वारे गाणी ऐकण्याचा आनंद घेता येईल.
कार्निव्हलमध्ये यासोबत अँड्राईड ऑटो प्ले आणि अॅपल कारप्ले सपोर्ट असणारा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. याच्या रिअर सीटवर 10.1 इंच ड्युअल टचस्क्रीन मिळेल.
किआ कार्निव्हल एमपीव्हीमध्ये व्हीआयपी सीट्स देण्यात आलेली आहे. ज्यात प्रिमियम नाप्पा लेदरचा वापर करण्यात आलेला आहे. ही कार स्मार्ट, सुरक्षित आणि फ्यूचरिस्टिक यूव्हीओ कनेक्टेड लग्झरी गाडी आहे. या कारची किंमत 25 लाख ते 30 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.