देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने आपली लोकप्रिय कार अल्टोला बीएस6 इंजिनसह लाँच केले आहे. कंपनीने एस-सीएनजीसह दोन व्हेरिएंटमध्ये ही कार लाँच केली आहे. अल्टो बीएस6 सीएनजी मॉडेल प्रति किलोग्रॅम 31.59 किलोमीटर मायलेज देते. यात दोन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यूनिट आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टम देण्यात आले आहे.

 

 

नवीन मारुती सुझुकी अल्टोमध्ये 796cc इंजिन मिळते. हे इंजिन 40.36 बीएचपी पॉवर आणि 60 एनएम टॉर्क निर्माण करते. पेट्रोलवर चालल्यावर हे इंजिन 47.33 बीएचपी पॉवर आणि 69 एनएम टॉर्क निर्माण करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.

 

मारुती सुझुकी अल्टोच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात एसी, पॉवर स्टेअरिंग, फ्रंट पॉवर विंडो मिळते. इंटेरिअरमध्ये डोर हँडल्सवर सिल्वर फिनिश आणि ड्युअल टोनसह अनेक खास गोष्टी आहेत. एक्सटेरिअरमध्ये व्हिल कव्हर्स आणि बॉडी कलर्ड बंपर, डोर हँडल मिळते. सुरक्षेसाठी यात ड्युअल एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट आणि रिअर पार्किंग सेंसर्स सारखे फीचर्स मिळतील.

 

नवीन अल्टोच्या किंमतीबद्दल सांगायचे तर याच्या अल्टो एलएक्सआय एस-सीएनजी व्हेरिएंटची किंमत 4,32,700 रुपये आणि  अल्टो एलएक्सआय (ओ) एस-सीएनजीची किंमत 4,36,300 रुपये आहे.

Find out more: