टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘नेक्सॉन ईव्ही’ अखेर लाँच केली आहे. कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये ही एसयूव्ही लाँच केली असून, याची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये आहे. नेक्सॉन ईव्हीच्या एक्सएम व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख रुपये, एक्सझेड+ व्हेरिएंटची किंमत 14.99 लाख रुपये आणि एक्सझेड+ लक्स व्हेरिएंटची किंमत 15,99 लाख रुपये आहे. यासोबत कंपनी घरी मोफत चार्जिंग डिव्हाईस इंस्टॉल करून देईल.
टॉप व्हेरिएंट एक्सझेड+ लक्समध्ये कंपनीने डीआरएलसोबत प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, 16 इंच डायमंड कट एलॉय, ऑटो रेन सेंसिंग वायपर्स, कीलेस एंट्री, लेदरेट अपहोलस्ट्री, सनरुफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 7 इंच इंफोटेनमेंट सिस्टम सोबत अनेक खास फीचर्स दिले आहेत.
टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये पर्मनंट मॅग्नेट सियक्रोन्स मोटार मिळेल. जे 127 बीएचपी पॉवर आणि 245 टॉर्क निर्माण करते. एसयूव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळेल.
एसयूव्ही केवळ 9.9 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडू शकते. ही एसयूव्ही ड्राईव्ह आणि स्पोर्ट अशा दोन ड्राईव्ह मोडमध्ये येते. नेक्सॉन ईव्ही फूल चार्जमद्ये 312 किमी अंतर पार करू शकते. तसेच स्टँडर्ड चार्जद्वारे बॅटरीला 20 टक्क्यांवरून 100 टक्के चार्ज होण्यास 8 तास लागतात. तर फास्ट चार्जरद्वारे 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 1 तास लागतो. कंपनी नेक्सॉन ईव्हीच्या बॅटरीवर 8 वर्ष अथवा 1.6 लाख किलोमीटर आणि मोटारवर 3 वर्ष अथवा 1.25 लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.