जर्मनीची लग्झरी कार कंपनी मर्सिडिज बेंझने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपली सर्वात वेगवान कार मर्सिडिज बेंझ एएमजी जीटी 63ए 4 डोर कूपे (Mercedes Benz AMG GT 63S 4 DOOR COUPE) लाँच केली आहे. ही जगातील सर्वात वेगवान कार सीरिज प्रोडक्शन 4 सीटर कार आहे.
या कारचा टॉप स्पीड ताशी 315 किमी असून, ही कार केवळ 3.2 सेंकदात ताशी 0 ते 100 किमी अंतर पार करू शकते. ही मर्सिडिजची आतापर्यंतची सर्वात वेगवान कार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन मर्सिडिज एएमजी जीटी 63एसची टक्कर पोर्शे Panamera Turbo शी होईल.
या वेगवान कारमध्ये 4.0 लीटर ट्विन टर्बो व्ही8 इंजिन देण्यात आलेले आहे. जे 639 एचपी पॉवर आणि 900एनएम टॉर्क निर्माण करते. यात 9 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स आणि सोबतच ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टम देण्यात आली आहे. इंटेरिअरबद्दल सांगायचा तर यात 12.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल. ज्यात इंस्ट्रूमेंशन आणि इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. स्टेअरिंग व्हिल, सेंट्रल कंसोल आणि टचपॅडमध्ये नवीन डिझाईन मिळेल.