ऑटो एक्स्पो 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आल्या. यातील एका विशेष कारने सर्वांचे लक्ष वेधले, ती म्हणजे महिंद्राची इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार फन्सटरने. ऑटो एक्स्पो 2020 मध्ये महिंद्राने आपली वेगवान इलेक्ट्रिक कार फन्सटर सादर केली असून, ही कार बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

 

महिंद्रा फन्सटरमध्ये 59.1 किलोवॉट-ऑवर बॅटरी देण्यात आली असून, याची मोटार 313 हॉर्स पॉवर जनरेट करते. या कारची टॉप स्पीड ताशी 200 किमी असून, ही कार केवळ 5 सेंकदामध्ये ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

महिंद्रा फन्सटरच्या लूकबद्दल सांगायचे तर यात बटरफ्लाय दरवाजे देण्यात आले आहेत. म्हणजेच याचे दरवाजे वरच्या बाजूला उघडतात. याच्या पुढील बाजूस ट्राय-बीम एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आलेले आहेत. बंपरवर ट्रिपल फॉग लॅम्प्स युनिट देण्यात आले आहे. याच्या ग्रिलमध्ये एलईडी लाईट्स देण्यात आलेली आहे. कारच्या बाजूला इनवर्टेड एल आकाराचे हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प देण्यात आलेले आहे.

 

महिंद्रा फन्सटर ही लूकमध्ये काहीप्रमाणात रेंज रोव्हर आणि इव्होकप्रमाणे आहे. मात्र इव्होकमध्ये बटरफ्लाय दरवाजे देण्यात आलेले नाही. महिंद्रा फन्सटरच्या इंटेरिअरबद्दल सांगायचे तर यात मोठी इंफोटेनमेंट स्क्रीन देण्यात आलेली आहे. यात मोठे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील मिळेल.

Find out more: