ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने स्थानिक कार बाजारात 10 टक्के हिस्सेदारी मिळविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. यासाठी कंपनीने एक नवीन योजना बनविली असून, या अंतर्गत कंपनी छोट्या शहरांमध्ये आपले डीलर वाढवणार आहे. यातील खास गोष्ट म्हणजे कंपनी आता छोट्या शहरातील पेट्रोल पंपांद्वारे कारची विक्री करणार आहे.
रिपोर्टनुसार, टाटा मोटर्सचे हेड ऑफ मार्केटिंग (पेसेंजर कार) विवेक श्रीवास्तव म्हणाले की, या नवीन प्रयोगाला इमर्जिंग मार्केट आउटलेट असे नाव दिले जाऊ शकते. पेट्रोप पंपांवरील शोरुममध्ये या छोट्या कार शोकेस होतील. त्यांची संख्या देखील पेट्रोल पंपाच्या आकारानुसार एक अथवा दोन असेल.
श्रीवास्तव यांनी सांगितले की, शहरानुसार लोकप्रिय कार्सना शोरुममध्ये प्रदर्शित केले जाईल. टियागोच्या ग्राहकाला टियागोच पाहायला आवडेल. इतर कारमध्ये त्याला आवड नसेल व त्यासाठी मोठ्या शोरुमची देखील गरज नाही.
या योजनेंतर्गत 400 शोरुम तयार करण्यात आले आहेत. कंपनीचे लक्ष्य दरवर्षी 100 असे शोरुम तयार करण्याचे आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरातील पेट्रोल पंपावर शोरुम बनविण्यास कमी खर्च येतो. अन्य ऑटोमोबाईल कंपन्यांनी देखील छोटे डीलरशीप सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.