ऑटोमोबाईल कंपनी फोर्डने आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘एंडोव्हर’ला बीएस6 मानक इंजिनसह भारतात लाँच केले आहे. या नवीन एंडोव्हरची किंमत 29.55 लाख ते 33.25 लाख रुपये आहे. या नवीन एंडोव्हरची किंमत जुन्या बीएस4 इंजिन मॉडेलच्या किंमतीत 1.45 लाख रुपये कमी आहे. मात्र ही केवळ सुरुवातीची किंमती असून, या ऑफरचा लाभ केवळ 30 एप्रिलपर्यंत बुकिंग करणाऱ्यांनाच मिळेल. 1 मे नंतर नवीन एंडोव्हरच्या किंमतीत 70 हजारांपर्यंत वाढ होईल.

 

नवीन एंडोव्हरमध्ये बीएस 6 मानक 2.0 लीटर इकोब्लू डिझेल इंजिनसोबत फोर्डचे नवीन 10 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन देण्यात आलेले आहे. नवीन एंडोव्हरमध्ये मिळणारे बीएस-6 2.0 लीटर इकोब्लू डीझेल इंजिन 168 हॉर्स पॉवर आणि 420 एनएम टॉर्क जनरेट करेत. हे नवीन इंजिन जुन्या 2.2 लीटर टीडीसीआय इंजिनपेक्षा 20 टक्के जास्त लो-अँड टॉर्क देईल. सोबतच जास्त फ्यूल एफिशियंट देखील असेल. 4X2 व्हर्जन 13.90 किमी प्रती लीटर मायलेज देईल. तर 4X4 व्हर्जन हे 12.4 किमी प्रती लीटर मायलेज देईल. हे नवीन इंजिन आवाज देखील कमी करते.

 

याशिवाय 10 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक ट्रांसमिशन असणारी फोर्ड एंडोव्हर भारतात सध्या एकमेव गाडी आहे. लूकबद्दल सांगायचे तर नवीन फोर्ड एंडोव्हर बीएस 6 मॉडेलप्रमाणेच दिसते. नवीन एसयूव्हीमध्ये कंपनीचे मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन फोर्डपास मिळेल. ही सिस्टम स्टार्टिंग, स्टॉपिंग, लॉकिंग आणि अनलॉकिंग, फ्यूल लेव्हल, गाडीला रिमोटने लोकेट करणे या सारखे फीचर्स देखील देते.

 

कंपनीने या एंडोव्हरमध्ये देखील टेरेन मॅनेजमेंट सिस्टम, अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो सपोर्टसह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, सनरूफ, सेमी ऑटो पॅरलल पार्क असिस्ट, पुश स्टार्ट बटन, हँड-फ्री पॉवर लिफ्ट रिअर गेट, हिल असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखे फीचर्स देखील मिळतील.

Find out more: