जीप कंपनीने आपल्या जीप कंपास एसयूव्हीचे (Jeep Compass) सर्व मॉडेल बीएस6 इंजिनसह भारतात लाँच केले आहेत. कंपनीने अद्याप या मॉडेल्सच्या किंमतीबाबत खुलासा केला नसला तर कंपनीने स्पष्ट केले की, बीएस6 पेट्रोल मॉडेल्सच्या किंमतीत 25 हजार रुपयांनी वाढ होईल. तर बीएस6 डिझेल मॉडेलची किंमत 1.1 लाख रुपयांनी वाढली आहे. जीप कंपासच्या सुरूवाती मॉडेलची एक्स शोरुम किंमत 15.60 लाख रुपये आहे. आता कंपनी याच्या बीएस6 इंजिन मॉडेल्सची विक्री करणार आहे.

बीए6 इंजिन मॉडेलच्या पॉवर आउटपुटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये पॉवरसाठी 2.0 लीटर मल्टीजेट II डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. याचे ऑइल बर्नर इंजिन 170 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीमध्ये मल्टीएअर पेट्रोल इंजिनचा देखील पर्याय मिळेल. हे इंजिन 161 बीएचपी आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते.

 

याच्या पेट्रोल व डिझेल दोन्ही इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसोबत 9 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशनचा देखील पर्याय मिळतो. अपडेट्सबद्दल सांगायचे तर याच्या डिझेल इंजिनमध्ये आता AdBlue ट्रँकचा समावेश करण्यात आला असून, हे इंजिनला साफ करण्यासाठी यूरियाचा वापर करते.

 

Jeep Compass च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर याच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टार्ट-स्टॉप सिस्टम आणि क्रूज कंट्रोल मिळेल. जीप कंपासच्या लिमिटेड व्हेरिएंटमध्ये आता नवीन डिझाईनचे 18 इंच एलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. इतर सर्व व्हेरिएंटमध्ये 17-इंच एलॉय व्हिल्स मिळतील.

सुरक्षेसाठी या एसयूव्हीमध्ये एअरबॅग्स, एबीएससोबत एबीडी, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, फ्रिक्वेंसी डँप्ड संस्पेंशन, चार डिस्स ब्रेकसोबत अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये 4 टेरेन मोड्ससोबत ऑल व्हिल ड्राईव्ह (एडब्ल्यूडी) सिस्टम देखील देण्यात आलेले आहे. यामध्ये रायडिंगसाठी ऑटो, सँड, मड आणि स्नो सारखे रायडिंग फीचर्स मिळतील.

 

Find out more: