
देशातील सर्वाधिक विक्री झालेली स्कूटर होंडा एक्टिवाचे नेक्सट जनरेशन मॉडेल होंडा एक्टिवा 6जीला कंपनीने 15 जानेवारीला लाँच केले होते. या स्कूटरमध्ये कंपनीने अनेक खास फीचर्स दिले आहेत.
नवीन होंडा एक्टिवा 6जी च्या डिझाईनमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. नवीन स्कूटरमध्ये एप्रॉन देण्यात आले आहे, जे आधीच्या तुलनेत एकदम नवीन आणि स्टाइलिश आहे. यात एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प, नवीन मोठी टेललाईट मिळेल. मागील बाजूला एक अतिरिक्त फ्यूल फिलर कॅप मिळेल.

या स्कूटरमध्ये बीएस-6 मानक 109सीसी इंजिन मिळते. नवीन इंजिनमध्ये कार्ब्युरेटरच्या जागी FIS Technology (फ्यूल इंजेक्शन सिस्टम टेक्नोलॉजी) देण्यात आली आहे. याचे इंजिन 8,000 rpm वर 7.68 bhp पॉवर आणि0 5,250 rpm वर 8.79 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
कंपनीचा दावा आहे की 5जीच्या तुलनेत एक्टिवा 6जी 10 टक्के अधिक मायलेज देईल. ही स्कूटर सरासरी 55 ते 60 किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
नवीन होंडा एक्टिवा 6जी मध्ये मल्टीफंक्शन बटन, पासिंग आणि स्टार्ट-स्टॉप बटन दिले आहेत. या स्कूटरमधील सर्वात मोठा बदल म्हणजे यात सायलेंट स्टार्ट एसीजी मोटार टेक्नोलॉजी आहे. या टेक्नोलॉजीद्वारे स्कूटर आवाज न करता चालू होते.

नवीन स्कूटरचा व्हिलबेस देखील मोठा आहे. स्कूटरच्या ग्राउंड क्लिअरेंसला वाढवण्यात आले आहे. स्कूटरच्या फ्रंटला 12 इंचाचे मोठे व्हिल आणि रिअरला 3 वे एडजस्टेबल सस्पेंशन देण्यात आलेले आहे, जे आतापर्यंतच्या सर्वात महागड्या बाईकमध्ये देण्यात येत होते. स्कूटर खराब रस्त्यांवर देखील सहज चालेल. सोबतच याच्या फ्रंट व्हिल्समध्ये काँबी ब्रेक आणि संस्पेशनसाठी टेलिस्कोपिक फोर्क देण्यात आले आहे. टॉप डिलक्स व्हेरिएंटमध्ये डिस्क ब्रेक मिळतो.

नवीन एक्टिवा 6जी मध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आलेले आहेत. यात रिमोट कॅच ओपनिंग, मल्टी फंक्शन-की सोबत अन्य फीचर्स देखील मिळतील. वन टच फ्यूल लॉक ओपनर सारखे फीचर्स या स्कूटरमध्ये कारचा अनुभव देतात. सीट उघडणे व बंद करण्यासाठी 3 मोड मिळतात. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन स्कूटरचे सीट मोठे आहे. या स्कूटरमध्ये एचईटी टेक्नोलॉजी देखील मिळेल. एक्टिवा 6जी स्टँडर्ड आणि डिल्कस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरची किंमत 63,912 रुपये आहे.