अनेकदा मोठ्या कुटुंबात प्रवासाला निघताना लहान कार असल्याने समस्या निर्माण होते. अशावेळी मल्टी पर्पज व्हिकल (एमपीव्ही) कामी येतात. आज अशाच काही एमपीव्हीबद्दल जाणून घेऊया, ज्यात मोठ्या कुटुंबासाठी बसायला आरामदायी जागा आहे व सोबतच या गाड्यांची किंमत 10 लाखांपेक्षाही कमी आहे.
रेनॉल्ट ट्रायबर –
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 999 सीसीचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 72 PS ची पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. या मिनी एमपीव्हीची सुरूवाती एक्स शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी इर्टिगा –
या गाडीमध्ये 1462 सीसी, K15B स्मार्ट हायब्रिट इंजिनसोबत 1498सीसी, DDis 225 इंजिनचा पर्याय देखील मिळतो. स्मार्ट हायब्रिड इंजिन 104 PS पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. तर 1498सीसी, DDis 225 इंजिन 95 PS पॉवर आणि 225Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देण्यात आले आहे. मारुती सुझुकी इर्टिगाची एक्स-शोरूम कीमत 7.59 लाख रुपये आहे.
रेनॉल्ट लॉजीमध्ये 1.5 लीटर dCi डिझेल आणि VGT सोबत1.5-लीटर dCi डिझेल इंजिन पर्याय मिळतो. याचे 1.5-लीटर dCi डिझेल इंजिन 85 PS पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. तर VGT सोबत येणारे 1.5 लीटर dCi डिझेल इंजिन 110 PS पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करते.
1.5-लीटर dCi डिझेल इंजिन हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसोबत येते. तर VGT 1.5-लीटर dCi डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनने सुसज्ज आहे. या मिनी व्हॅनची सुरूवाती किंमत 8.63 लाख रुपये आहे.
होंडा बीआर-व्ही –
होंडा बीआर-व्ही भारतीय बाजारात 1487 सीसी 4 सिलेंडर, SOHC-i-VTEC पेट्रोल इंजिन सोबत येते. तर यात 1498 सीसी 4सिलेंडर, SOHC-i-VTEC डिझेल इंजिन पर्याय देखील मिळेल. याचे 1487सीसी पेट्रोल इंजिन 119 PS पावर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. तर 1498 सीसी डिझेल इंजिन 100 PS पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करते.
याच्या पेट्रोल इंजिनमध्ये सीव्हीटीसोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन मिळेल. तर डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन येते. होंडा बीआर-व्हीची सुरूवाती किंमत 9.52 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी एक्सएल 6 –
मारुती सुझुकी एक्सएल 6 एमपीव्हीमध्ये 1462 सीसीचे K12B स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 105 PS पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते.
हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन सोबत येते. तसेच यात 4-ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्याय देखील मिळेल. या एमपीव्हीची किंमत 9.84 लाख रुपयांपासून सुरू आहे.