ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने आधीच सांगितले आहे की कंपनी डिझेल इंजिनच्या मॉडेल्सला बीएस6 मानक इंजिनमध्ये अपग्रेड करणार नाही. पुढील महिन्यापासून बीएस6 एमिशन नॉर्म्स लागू होतील. त्यानंतर देशात बीएस6 वाहनांची विक्री बंद होईल. त्यामुळे आता मारुती सुझुकी आपल्या एरेना आणि नेक्सा आउटलेट्सवर बीएस4 मानक मॉडेलवर भरघोस सूट देत आहे.
ऑल्टो 800 –
कंपनी या कारवर एकूण 48 हजार रुपये डिस्काउंट देत आहेत. यातील 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपये कॉर्पोरेट बोनस ऑफर देण्यात येत आहे.
सिलॅरियो –
या कारवर 30,000 रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. याप्रकारे एकूण 53,000 रुपये डिस्काउंट मिळत आहे.
ईको –
या मिनी व्हॅनवर 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट व आणखी 3 हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे.
एस-प्रेसो –
एस-प्रेसोवर 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.
वॅगन आर –
कंपनीच्या या लोकप्रिय कारवर 15 हजारांचे कॅश डिस्काउंट, 20 हजार एक्सचेंज बोनस आणि 2,500 रुपये कॉर्पोरेट बोनस असा एकूण 37,500 रुपये डिस्काउंट मिळत आहे.