मुंबई : बजाज ऑटो नवीन डॉमिनार बाईक लाँच करत आहे. Bajaj Dominar 250 असं या बाईकचे (Bajaj Dominar 250) नाव आहे. Dominar ब्रँडच्या नावाने बजाजची ही दुसरी बाईक असेल. कंपनीने एक टीजर व्हिडीओ लाँच करत बाईक लाँचिंगची (Bajaj Dominar 250) माहिती दिली.

 

बजाज डॉमिनार 250 मध्ये नवीन इंजिन मिळणार आहे. बजाज ऑटोकडे 250 सीसीचे इंजिन नाही. याचा अर्थ डॉमिनारमध्ये कंपनीने नवीन इंजिन दिले आहे. जे KTM 250 Duke मध्ये दिलेले 248.8 cc सिंगल-सिलिंडर इंजिनवर आधारित असेल. केटीएममध्ये हे इंजिन जवळपास 30 bhp पावर आणि 24 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. डॉमिनार 250 मध्ये हे इंजिन कमी पावरसह दिले जाऊ शकते. इंजिनमध्ये 6 गिअर असतील, असं म्हटलं जात आहे.

 

डॉमिनार 250 ची डिझाइन आणि स्टायलिंग डॉमिनार 400 प्रमाणे आहे. लीक झालेल्या फोटोमुळे स्पष्ट होत आहे की छोटी डॉमिनारमध्ये आता अप-साइड-डाऊन फ्रंट फोर्क्स, रेग्युलर अलॉय वील्ज, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब रेल्स आणि एलईडी टेललॅम्प मिळतील. डॉमिनार 400 प्रमाणे डॉमिनार 250 मध्ये ट्विन-पॉड एग्जॉस्ट सिस्टमही मिळेल.

 

किंमत

बजाज डॉमिनार 400 ची किंमत 1.90 लाख रुपये आहे. डॉमिनार 250 ची किंमत जवळपास 1.45 लाख रुपये असेल अशी शक्यता आहे. मार्केटमध्ये या बाईकची टक्कर Yamaha FZ25, KTM 250 Duke आणि Royal Enfield Thunderbird 350X सारख्या बाईकसोबत होईल.

 

Find out more: