पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्तियानो रोनाल्डो सध्या त्याच्या गावी मेदेरा येथे कुटुंबासह सेल्फ क्वारंटाइन आहे. युवेंटसच्या या सुपरस्टारने या काळात बुगाटीची लग्झरी चेनटोडीओस कार ऑर्डर केली असल्याचे समजते. ही लिमिटेड एडिशन कार असून त्याची १० युनिट बनविली गेली आहेत.
या कारची किंमत ८० कोटी रुपये असून रोनाल्डोच्या कार ताफ्यातील ही सर्वात महागडी कार आहे. रोनाल्डोच्या संग्रही आधीच १५ कोटींची वेरोन ग्रँड स्पोर्ट आणि २० कोटींची शिरोन या दोन बुगाटी कार्स आहेत. त्याची नवी बुगाटी सर्वात महागडी असून ० ते १०० किमीचा वेग ती २.४ सेकंदात घेते.
रोनाल्डोने करोना विरुध्दच्या लढाईत मदतीचा हात दिला आहेच. त्याने त्याच्या शहरातील हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर्स दिले आहेत तसेच त्याच्या दोन फोर स्टार्स हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटल मध्ये करून ती करोना रुग्णांसाठी उपलब्ध केली आहेत. रुग्णांच्या उपचाराचा खर्च रोनाल्डो करणार आहे तसेच डॉक्टर, नर्स याचे पगार आणि त्यांच्या निवास, खाणे पिणे, प्रवास याचाही खर्च करणार आहे.
ok युवेंटस तर्फे रोनाल्डोने त्याचा तीन महिन्याचा पगार ( दहा लाख युरो म्हणजे ८४ कोटी रुपये) अगोदरच याच कामासाठी दान केला आहे. त्याच्याबरोबरच्या या क्लबच्या सर्व खेळाडूंनी ७५३ कोटींची मदत करोनासाठी दिली आहे.