महिंद्रा स्कॉर्पियो देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही पैकी एक आहे. महिंद्राने नुकतेच आपल्या वेबसाईटवर बीएस-6 कंम्प्लायंट स्कॉर्पियोची माहिती दिली आहे. एसयूव्हीच्या लूकमध्ये काहीही बदल केलेले नसले तरी इतर गोष्टींमध्ये कंपनीने महत्त्वपुर्ण बदल केले आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
नवीन महिंद्रा स्कॉर्पियो एस5, एस7, एस9 आणि एस11 या चार व्हेरिएंटमध्ये येईल. बीएस-6 स्कॉर्पियोच्या लूकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अपडेटेड मॉडेलमध्ये देखील 7-स्लॉट ग्रिल, मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेंट्स सोबत राउंड फॉग लॅम्प्स, हुड स्कूप, 5-स्पोक 17-इंच एलॉय व्हिल्ज, टर्न इंडिकेटर्स सोबत आउट साइड रिअर व्ह्यू मिरर्स आणि रेड लेंस एलईडी टेल लॅम्प्स मिळेल.
महिंद्रा स्कॉर्पियोमध्ये कॅबिन लेआउटचे 4 पर्याय मिळतील. पहिल्या पर्यायामध्ये 7 सीटर साइड फेसिंग, दुसरा लाइनमध्ये बेंच सीट आणि तिसऱ्या लाइनीत दोन साइड फेसिंग जम्प सीट्स आहेत. दुसरा पर्याय 9 सीटर साइट फेसिंग लेआउट आहे. तिसरा पर्याय 7 सीटर फ्रंट फेसिंग लेआउट आहे. ज्यात दुसऱ्या रांगेत दोन कॅप्टन सीट्स आणि तिसऱ्या रांगेत बेंच सीट्स मिळतील. चौथा पर्याय 8 सीटर फ्रंट फेसिंग पर्याय आहे, ज्यात दुसऱ्या व तिसऱ्या रांगेत बेंच सीट्स असेल.
फीचर्सबद्दल सांगायचे तर याच्या टॉप-एंड व्हेरियंटम्ये ब्लूटूथ सोबत 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, AUX-IN, जीपीएस नेव्हिगेशन सोबत USB कनेक्टिविटी, फॉक्स लेदर अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, क्रूज कंट्रोल आणि रिअर एसी वेंट्स सारखे फीचर्स आहेत.
सेफ्टीसाठी यात ड्यूल एयरबॅग्स, एबीएस, पॅनिक ब्रेकिंग इंडिकेशन, इंजिन इम्मोबिलाइजर, सीट-बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि ऑटो डोर लॉक फीचर्स आहेत.
अपडेटेड स्कॉर्पियो बीएस6 इंजिन 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिनसोबत येईल. हे इंजिन 138bhp पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जेनरेट करते. एस5 व्हेरिएंटसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि अन्य व्हेरिएंटसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर ही अपडेटेड स्कॉर्पियो लाँच होण्याची शक्यता आहे.