मेल्यानंतर देखील मानवीय शरीर एक वर्ष हलत असते असे जर तुम्हाला कोणी म्हटले तर ? नक्कीच तुम्हा त्यावर विश्वास करणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या एका वैज्ञानिकाने दावा केला आहे की, मनुष्याच्या मृत्यूनंतर देखील 1 वर्ष हलत असते.

ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक एलिसन विन्सन यांनी या गोष्टीचा शोध लावला आहे. 17 महिने एका शवाचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यावर रिसर्च केला व त्या शवाच्या हालचालींचे फोटो देखील काढले. एलिसन विन्सनने सांगितले की, मेल्यानंतर ही मनुष्य शांत नसतो.

त्यांना अभ्यासात निदर्शनास आले की, सुरूवातील एका शवाचे हात शरीराला जोडून ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते हळूहळू बाहेर सरकत होते. याचे कारण त्यांनी सांगितले की, शवाची हालचाल ही डीकंपोजिशन प्रक्रियेशी जोडलेली आहे. जसजसे शव सुकते, तसतसे ते हलू लागते.

या शवावर रिसर्च करण्यासाठी एलिसन दर महिन्याला तीन तासांची फ्लाइट करून कॅरेन्स ते सिडनीला येत असे. सिडनी येथील Australian Facility for Taphonomic Experimental Research (AFTER) येथे या शवावर रिसर्च सुरू होता.

मानवीय शरीराची हालचाली टिपण्यासाठी  टाइम लॅप्स कॅमेरा लावण्यात आला होता. हा कॅमेरा दर 30 मिनिटाला शवाचे फोटो काढत असे.  एलिसनचे म्हणणे आहे की, तिचा हा रिसर्च पोलिसांना मनुष्याचा मृत्यू कोणत्यावेळी झाला हे सांगण्यास मदत करेल.

एलिसन सांगते की, मृत्यूविषयी लहानपणापासून रूची होते. मृत्यूनंतर मनुष्याच्या शरीराचे काय होते, त्यात काय हालचाली होतात, हे जाणून घेण्यात मला लहानपणासूनच रूची होते.


Find out more: