देशातील आघाडीची सार्वजनिक बँक असलेल्या ‘एसबीआय’ने (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने सर्व कालावधीतील कर्जावरील व्याजदरात कपात करत असल्याची घोषणा सोमवारी केली. एमसीएलआरमध्ये 10 बेसिक पॉइंटची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गृहकर्जही स्वस्त होणार आहे, तर मुदत ठेवीवरील व्याजदर घटवले आहेत.

मंगळवारपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत.एसबीआयने 2019-20 या चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने आढावा बैठकीनंतर रेपो दर 1.1 टक्क्यांनी कमी केल्यानंतर एसबीआयने कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बँकेच्या तिजोरीत असलेली रोख रक्कम हेही एक कारण मुदत ठेवीवरील व्याजदर कपातीमागे असल्याचे म्हटले जात आहे.

बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. बँकेने किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांवरून 0.25 टक्क्यांची कपात केली आहे, तर मोठ्या मुदत ठेवीवरील व्याजदर 0.10 टक्क्यांवरून 0.20 टक्के इतका कमी करण्यात आला आहे.कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे बँकेचा वार्षिक मुदतीचा एमसीएलआर 8.25 वरून घटून 8.15 टक्क्यांवर आला आहे. उद्यापासून (10 सप्टेंबरपासून) नवीन व्याजदर लागू होणार आहेत.

Find out more: