प्रसिद्ध मोटर कंपनी फोर्ड दरवर्षी प्लास्टिकच्या फेकण्यात आलेल्या 120 कोटी बाटल्यांना रिसायकलकरून त्याद्वारे पार्ट्स तयार करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, अगदी छोट्या प्रमाणात का होईना, पर्यावरणाला स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

 

फोर्ड मोटर कंपनीचे डिझाईन इंजिनिअर थॉमस स्वेडर म्हणाले की, त्यांच्या सर्व वाहनांमध्ये एक मोठा भाग अंडरबॉडी शिल्डचा असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची गरज असते. जर ठोस प्लास्टिकचा वापर केला तर वाहनाचे वजन वाढेल. कंपनी दरवर्षी 120 कोटी बाटल्या रिसायकल्ड करून ठोस प्लास्टिकच्या जागी त्याचा वापर करते. बाटलीचे प्लास्टिक ठोस प्लास्टिकपेक्षा तीन पट अधिक हलके असते आणि अधिक काळ टिकते.

 

त्यांनी सांगितले की, फोर्डच्या सर्व कार, एसयूव्ही, एफ-सीरिज ट्रकमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला जातो. हे प्लास्टिक इंजिन अंडर शील्ड्स, फ्रंट आणि रिअर व्हिल आर्च लाइनर्सच्या निर्मितीसाठी फायदेशीर आहे. कंपनीने 2020 मध्ये येणाऱ्या काही वाहनांमध्ये या प्लास्टिकचा वापर केला आहे, जेणेकरून आतील वातावरण थंड, शात राहील. मागील 1 दशकामध्ये जगभरातील वाहनांतील आतील भागांमध्ये प्लास्टिकचा वापर वाढला आहे.

 

स्वेडर यांनी सांगितले की, प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकल्ड प्रक्रियेत छोटे-छोटे तुकडे केले जातात. त्यानंतर त्याचे फायबर तयार केले जाते. बाटल्यांद्वारे मिळालेल्या फायबरला इतर फायबरमध्ये मिसळून कपड्यासारखा आकार दिला जातो. त्यानंतर एक शीट तयार केली जाते, जी वाहनांच्या वेगवेगळ्या भागांसाठी वापरली जाते.

Find out more: