कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये यासाठी जगात नेट बंद करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. नेटबंदीमुळे अफवा पसरण्यावर भलेही लगाम लागली असे, मात्र यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 2016 च्या तुलनेत 2019 मध्ये नेटबंदीमध्ये जवळपास 235 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतासह जगभरात नेटबंदीचा सर्वाधिक परिणाम व्हॉट्सअॅपवर झाला.
आकड्यांनुसार, नेट बंद करणाऱ्या देशांमध्ये इराक, सुडान, भारत व्हेनेजुएला आणि इराण सर्वात पुढे आहे. मागील वर्षी नेटबंदीच्या प्रमुख 122 घटना घडल्या. यातील 90 घटना भारतात घडल्या. ज्यामुळे भारतीय अर्थव्यस्थेला 1.3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. तज्ञांचे म्हणणे आहे की भारताला यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मिरमधील नेटबंदी केल्यापासून याचा अधिक फटका बसला आहे.
नेटबंदीचा सर्वाधिक परिणाम व्हॉट्सअॅपवर झाला. त्यानंतर फेसबूक आणि युट्यूबवर याचा परिणाम दिसून आला. एका अभ्यासानुसार मागील वर्षी नेटबंदीमुळे जगभरात जवळपास 6,236 तास व्हॉट्सअॅप बंद होते. भारतासह श्रीलंका आणि सुडानवर देखील या परिणाम पाहिला मिळाला. जागतिक स्तरावर यामुळे 8 अब्ज डॉलरचे नुकसान झाले.