गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. सरकार देखील इलेक्ट्रिक्स वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी सरकार इंफ्रास्ट्रक्चर देखील तयार करत आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) देशभरातील विविध हायवेवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यासाठी ईईएसएलसोबत करार केला आहे.

 

एनर्जी एफिशियंसी सर्विसेजने (ईईएसएल) देशभरात चार्जिंग स्टेशन उभारण्यास महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याआधी देखील ईईएसएलने देशभरात चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती करण्यासाठी हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एसपीसीएल) सोबत करार केला आहे.

 

ईईएसएल हे वीज मंत्रालयाच्या आधीन येणारे चार उपक्रम – एनटीपीसी लिमिटेड, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स, आरईसी लिमिटेडचा संयुक्त उपक्रम आहे. ईईएसएलनुसार राष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन कार्यक्रमांतर्गत एचपीएसएल आणि भेलसोबत करार केला आहे. या करारानुसार, दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा दिली जाईल.

Find out more: