अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टम लाँच झाल्यापासून सर्वच फोनमध्ये गुगलची ऑपरेटिंग सिस्टम आहे. जगभरातील अँड्राईड फोनवर गुगलचा कब्जा आहे. गुगलचे मॅप्स, गुगल क्रोम, गुगल म्यूझिक हे आधीपासूनच फोनमध्ये उपलब्ध असते. मात्र आता गुगलचा ऑपरेटिंग सिस्टमवर असलेला दबदबा लवकरच समाप्त होण्याची शक्यता आहे. कारण चीनच्या चार सर्वात मोठ्या स्मार्टफोन कंपनी ह्युवई, व्हिवो, ओप्पो आणि शाओमी एका नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहेत.

 

या चार कंपन्यांनी नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठी भागिदारी केली असून, या अंतर्गत अ‍ॅप डेव्हलपर्स अ‍ॅप स्टोरवर आपले अ‍ॅप्स पब्लिश करु शकतील. या भागिदारीला ग्लोबल डेव्हलपर्स सर्व्हिस अलायंस (जीडीएसए) असे नाव देण्यात आलेले आहे. मागीलवर्षी ह्युवई कंपनीवर अमेरिकेने प्रतिबंध लादल्याने कंपनीने स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम हार्मनीओएस तयार केली होती. यासोबत कंपनीने स्वतःचे मॅपिंग अ‍ॅप देखील लाँच केले आहे.

 

जीडीएसए अंतर्गत जगभरातील कोणतेही डेव्हलपर्स गेम, म्यूझिक, चित्रपटासारखे अनेक अ‍ॅप्स जीडीएसएच्या अ‍ॅप स्टोरवर पब्लिश करू शकतात. या भागिदारीचा उद्देश गुगलचे अ‍ॅप स्टोरवर असलेली एकाधिकारशाही समाप्त करणे आहे. जीडीएसएचे लाँचिंग मार्च 2020 सांगितले जात आहे. मात्र चीनमधील कोरोना व्हायरसमुळे याला विलंब देखील होऊ शकतो. जीडीएसएच्या अ‍ॅप स्टोरला भारतासह इंडोनेशिया आणि रशियामध्ये देखील लाँच केले जाईल.

 

जीडीएसए अ‍ॅप स्टोर आल्यानंतर गुगलला जवळपास 60 टक्के मार्केट शेअरचे नुकसान होईल. आयडीसीच्या एका रिपोर्टनुसार, ग्लोबल मार्केट शेअरमध्ये या 4 कंपन्यांची हिस्सेदारी 40.1 टक्के आहे. तर 20 टक्के बाजारावर अ‍ॅपलचे वर्चस्व आहे. त्यामुळे ओप्पो, ह्युवई, व्हिवो आणि शाओमी या कंपन्यांनी गुगल प्ले स्टोरचा वापर बंद केल्यास गुगलला मोठे नुकसान होईल.

 

Find out more: