चीनच्या वुहान मधून जगप्रवासाला निघालेल्या करोना विषाणूने इटली मध्ये हाहाक्कार माजविला असून १०१६ बळी घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध स्पोर्ट्स कार कंपनी लोम्बर्गिनीने त्याचे उत्पादन २५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे या दरम्यान या कारखान्यात एकही नवीन कार तयार केली जाणार नसल्याची घोषणा कंपनीने केली आहे. स्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा कार उत्पादन सुरु करण्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे.

 

करोनाच्या फैलावामुळे जगभरची अर्थव्यवस्था हलली असून बहुतेक उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याला ऑटो क्षेत्र अपवाद राहिलेले नाही. लोम्बर्गिनीचे सीईओ स्तेफानो डॉसेमीसिली यांनी या संदर्भात एक इमेल केला असून उत्तर इटली मधील बोलोग्नो प्रकल्प बंद केला जात असल्याचे सूचित केले आहे. ते लिहितात, सामाजिक जबाबदारी आणि लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.

 

परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, गरज भासल्यास आवश्यक उपाययोजना केली जाईल. विशेष म्हणजे लोम्बर्गिनीचा सर्वाधिक खप अमेरिकेत आहे तर त्यापाठोपाठ या कारची विक्री होणारा दोन नंबरचा देश चीन आहे. गतवर्षी चीन, हॉंगकॉंग आणि मकाऊ मध्ये ७७० लोम्बर्गिनी विकल्या गेल्या होत्या तर अमेरिकेत हीच संख्या २७३४ आहे.

 

Find out more: