मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनने जगभरात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी 10 कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. बिल गेट्स यांनी सांगितले की, या 10 कोटी डॉलर व्यतिरिक्त अमेरिकन सरकारच्या मदतीसाठी 50 लाख डॉलर देखील देण्यात येतील. याबाबतची माहिती देताना गेट्स यांनी लोकांना शांत राहण्यास व काळजी घेण्याचा आवाहन केले आहे.
गेट्स हे सोशल मीडियावर म्हणाले की, तपासणीसाठी शहर व संस्था बंद करण्यात काहीही अडचण नाही. याचा फायदा असा होईल की लोक घरातून बाहेर पडणार नाहीत व नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल. सामाजिक पद्धतीने वेगळे राहण्यास यश येईल.
गेट्स म्हणाले की, संपुर्ण जगात आर्थिक नुकसानीची चिंता आहे. मात्र विकासशील देश यामुळे जास्त प्रभावित होतील. कारण असे श्रींमत देश सामाजिक अंतर निर्माण करू शकत नाहीत. सोबतच विकासशील देशांमध्ये हॉस्पिटल कमी आहेत व त्यांची क्षमता देखील कमी आहे. गेट्स फाउंडेशन डायग्नोस्टिक्स, वैज्ञानिक आणि लॅबसोबत काम करत आहेत.