कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. जेफ बेझॉस यांच्यापासून ते मुकेश अंबानी यांच्यापर्यंत जगातील सर्वात श्रींमत व्यक्तींचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 121 अब्ज डॉलर असून, कोरोनामुळे त्यांचे एकूण 5 अब्ज डॉलर (35 हजार कोटी रुपये) एवढे नुकसान झाले आहे.
बिल गेट्स –
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 114 अब्ज डॉलर असून, कोरोना व्हायरसमुळे त्यांचे तब्बल 2 अब्ज डॉलरचे (14 हजार कोटी रुपये) नुकसान झाले आहे.
मार्क झुकरबर्ग –
फेसबुकचा संस्थापक असलेल्या मार्क झुकरबर्गची संपत्ती 5,560 कोटी यूएस डॉलर आहे. कोरोनामुळे त्याचे तब्बल 21 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुकेश अंबानी –
भारतातील सर्वात श्रींमत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांना कोरोना व्हायरसमुळे तब्बल 6,300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बेर्नार्ड अर्नाल्ट –
फ्रान्सची फॅशन कंपनी लुइस वितांचे मालक बेर्नार्ड अर्नाल्ट यांचे कोरोना व्हायरसमुळे तब्बल 35 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.