नवी दिल्ली : देशभरात करोनाचा वाढता संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मास्क आणि हँड सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी वाढली असल्यामुळे मास्क आणि हँड सॅनिटायझरचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे या वस्तूंच्या किंमती अनेकपटींनी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या वस्तूंच्या किंमती निश्चित केल्या आहेत.


सरकारने निश्चित केलेल्या किंमतींनुसार हँड सॅनिटायझरच्या 200 ML बाटलीची किरकोळ किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. यासोबतच इतर आकाराच्या बाटल्यांच्या किंमतीही याच स्तराच्या असणार आहेत. या किंमती 30 जून 2020 पर्यंत संपूर्ण देशभर लागू असणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

 

जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकची किंमत 12 फेब्रुवारी 2020 रोजी जेवढी होती तेवढीच असणार असेल. पासवान यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 2 प्लाय मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये आणि 3 प्लायची प्लायची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त नसेल. करोना विषाणूच्या जलद प्रसारानंतर विविध फेस मास्क, त्यांच्या निर्मितीसाठी गरजेची सामुग्री आणि हँड सॅनिटायझरच्या किंमतीत वाढ झालेली आहे. सरकारने याकडे गांभिर्याने पाहत किंमती निश्चित केल्या आहेत.

Find out more: