योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद तर्फे येत्या १५ दिवसात ‘‘ऑर्डर मी’ नावाने ईकॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच होत असून येथे खास करून मेड इन इंडिया उत्पादने व स्वदेशी माल उपलब्ध होणार आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार ऑर्डर मी नावाने लाँच होत असलेल्या या इ प्लॅटफॉर्मवर पतंजली आयुर्वेदची सर्व उत्पादने मिळतीलच पण दुकानातून विकली जाणारी अन्य स्वदेशी किंवा भारतीय उत्पादनेही मिळतील. कोणताही जादा चार्ज न घेता ग्राहकाने खरेदी करताच काही तासात ही उत्पादने त्याला होम डिलीव्हरीने मिळू शकतील.
या प्लॅटफॉर्मवर १५०० पेक्षा अधिक डॉक्टर युजरला आवश्यकतेनुसार मोफत सल्ला देणार असून येथे योग प्रशिक्षणही दिले जाणार आहे. कंपनीचे सीइओ आचार्य बाळकृष्ण म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या वोकल फॉर लोकलला समर्थन देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.
आणि इ कॉमर्सच्या माध्यमातून स्वदेशी उत्पादने ग्राहकांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पतंजलीने सर्व स्थानिक रिटेलर विक्रेते तसेच छोट्या दुकानदारांशी संपर्क साधला आहे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशीही संपर्क केला आहे.
‘ऑर्डर मी’ अॅप अँड्राईड आणि आयओएस दोन्हीवर चालेल. पतंजलीच्या इन्फोर्मेशन कंपनीच्या इंजिनीअर्सनी ते तयार केले आहे असेही समजते.