नुकतीच आपली कॉम्पॅक्ट एमपीवी ट्रायबर रेनॉल्टने या कार उत्पादक कंपनीने भारतात लाँच केले आहे. कंपनी आता आपली नवीन फेसलिफ्ट क्लिड कार लाँच करत आहेत. कंपनी त्याशिवाय क्वीडचे इलेक्ट्रिक व्हर्जनही भारतात लाँच करत आहे. पण कंपनीने यापूर्वी चीनमध्ये क्विड इलेक्ट्रिक मॉडल लाँच केले आहे.

चीनमध्ये रेनॉल्टने क्विडला City K-ZE नावाने लाँच केले आहे. ही एक इलेक्ट्रॉनिक कार आहे. या कारमध्ये पेट्रोल कारच्या तुलनेत अनेक बदल केले आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक कारमध्ये फरक दिसवा म्हणून कंपनीने इलेक्ट्रॉनिक कारमध्ये अनेक बदले केले आहेत. सर्वात पहिली 2018 मध्ये इलेक्ट्रॉनिक कार क्विडची संकल्पना सादर करण्यात आली होती.

क्विड City K-ZE एकदा फुल चार्ज केल्यावर कार 271 किमी अंतर सहज धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 26.8kWh लिथिअम-आयन बॅटरी पॅक दिलेला आहे. जो 43.3bhp आणि 125Nm टॉर्क जनरेट करते. कारला CMF-A प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.

या कारचे वैशिष्ट्य बॅटरी आणि इलेक्ट्रिनिक पावरट्रेन आहे. क्विड City K-ZE चा मायलेज चांगला आहे. त्यासोबतच या कारमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते. कारची बॅटरी एसी आणि डीसी दोन्ही फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एक डीसी चार्जर फक्त 30 मिनिटमध्ये बॅटरीला 30 ते 80 टक्के चार्ज करु शकते.

कारमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे ज्यामुळे आपण स्मार्टफोन कनेक्ट करु शकतो. किंमत पाहिली तर क्विड City K-ZE च्या बेस वेरिअंटची किंमत चीनमध्ये 61,800 युआन आहे. जी भारतात अंदाजे 6.22 लाख रुपये आहे. लवकरच ही कार भारतात लाँच केली जाईल. पण या कारची किंमत येथे 10 लाख असेल, असे म्हटले जात आहे.





Find out more: