देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने आपली कॉम्पॅक्ट सेडान कार टीगोर ईव्ही लाँच केली आहे. कंपनीने आधीच्या मॉडेलपेक्षा यात अनेक बदल केले आहेत. कंपनीने टाटा टीगोरची रेंज वाढवली आहे. आता ही कार फुल चार्जमध्ये 213 किलोमीटर मायलेज देईल आणि याला ARAI ने सर्टिफाइड केले आहे. याआधीचे मॉडेल फुल चार्जिंगमध्ये 142 किमी जात असे. नवीन टीगोर XE+, XM+ और XT+ या तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे.
नवीन टीगोर ईव्हीची एक्श शोरूम किंमत 9.44 लाख रूपये आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही कार कनेक्टिविटी आणि आराम प्रदान करते. याचबरोबर जास्त प्रदुषण देखील करत नाही.
कंपनीने या कारवर 3 वर्षांची अथवा 1.25 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. यामध्ये 72 व्ही, तीन फेज असणारे एसी इंडक्शन मोटार मिळेल. जे 40 बीएचपी आणि 105 एनएनचा टॉर्क देते. यामध्ये सिंगल स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन देखील मिळेल. कंपनीने दावा केला आहे की, केवळ 12 सेंकदात ही कार ताशी 0 ते 60 किमीचा वेग पकडेल. याची टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे. कारचे एकूण वजन 1516 किलो आहे.
DC15 kW फास्ट चार्जरद्वारे ही कार 90 मिनिटात 80 टक्के चार्ज होईल. स्टँडर्ड एसी वॉल सॉकेटद्वारे कार सहा तासात 80 टक्के चार्ज होईल.