![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/cricket/87/ind vs wi-415x250.jpg)
तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, भारत आणि यजमान वेस्ट इंडिज संघात आज दुसरा सामना खेळवला जात आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथील मैदानावर रंगणाऱ्या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता दोन्ही संघ मालिकेत बाजी मारण्याच्या प्रयत्नात असतील. यजमान वेस्ट इंडिज संघाने टी-२० मालिका गमावल्यामुळे वन-डे मालिका जिंकण्याकडे त्यांचा कल असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यातही भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.