नुकताच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने हरिणायामधील मुलीशी लग्न केले. हसन आणि शामियाचा निकाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसुद्धा भारतीय मुलीसह विवाहबंधनात अडकणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, हे दोघे लग्न कधी करणार याबद्दल अद्याप काही समोर आले नाही. त्याची प्रेयसी विनी सोशल मीडियावर खूप अॅॅक्टिव असते. मैक्सवेल आणि विनीचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर दिसतात. मैक्सवेल आणि विनी एकमेकांचे फोटो स्वतःच शेअर करतात.

दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेट याने भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न केले आहे. त्यामुळे, मैक्सवेल आणि विनी- हे दोघे लग्न कधी करणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.


Find out more: