वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रीक घेणारा भारताचा माजी गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीन अहमद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसा केल्याप्रकरणी शमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018मध्ये मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहांने मारहाणी, बलात्कार आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते.
या सगळ्या प्रकरणी हसीन जहाँनं शमी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळं शमीचे क्रिकेटमधील करिअर पणाला लागले होते. सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळत आहे. त्यामुळं त्याला तातडीनं भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ प्रकरणात तब्बल 20 जणांचा जबाब सादर करण्यात आला होता. हसीन जहांनं अमरोहा पोलिसांवरही आरोप केले होता. या प्रकरणाची चौकशी करण्याती आली होता. तब्बल एका वर्षापासून या दोघांमधील वाद सुरू आहे.