भारताने आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या २०-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १४९ धावा केल्या. कर्णधार क्विन्टॉन डीकॉकचे अर्धशतक व त्याने तेम्बा बावुमाच्या साथीत केलेली अर्धशतकी भागीदारी हे त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

आफ्रिकेने दिलेल्या आवाहनाचा पाठलाग करतांना भारताच्या डावाचीही सुरूवात निराशाजनक झाली. भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा केवळ १२ धावा काढून बाद झाला. शिखर धवन व कोहली यांनी ६१ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला.

मोठ्या कामगिरीची अपेक्षा असलेला धवनने ३१ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. त्यामध्ये त्याने ४ चौकारांबरोबरच एक षटकारही मारला.  ऋषभ पंत येथेही अपयशीच ठरला. त्याला फक्त ४ धावाच करता आल्या.

त्यानंतर कोहलीने आपल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर विजय खेचून आणला. विराटने ५२ बॉलमध्ये ७२ धावा केल्या.


Find out more: