मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘सौरभ गांगुली’ या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड झाली आहे. सौरभ गांगुली 2020 पर्यंत आपल्या पदावर कार्यरत असणार आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्‍यता आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय 23 ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या 23 ऑक्‍टोबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, या दृष्टीने रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय यांना सचिवपद आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण सिंग धुमाळ यांच्या नावांबाबत संघटकांचे एकमत झाले आहे.


Find out more: