नवी दिल्ली – नेपाळच्या राष्ट्रीय संघाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) सदस्यत्व बहाल केले आहे. पारस खडकाने यापूर्वी एक दिवस अगोदर संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याने नेपाळला मोठा धक्का बसला होता. ट्विटच्या माध्यमातून पद सोडत असल्याची माहिती पारसने दिली होती.

आयसीसीचा नेपाळ संघावरील बंदी हटवण्याचा निर्णय आनंददायी आहे. नव्या समितीला खूप खूप शुभेच्छा! नेपाळ क्रिकेट, खेळाडूंच्या सुधारणेवर त्यांनी भर द्यावा, असा उल्लेख पारसने आपल्या ट्विटमध्ये केला असून संघाचे कर्णधारपद मी सोडत असल्याचेही त्याने म्हटले आहे. आयसीसीने नेपाळशिवाय झिम्बाब्वे संघावरील बंदी देखील हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

जुलैमध्ये आयसीसीने नेपाळ आणि झिम्बाब्वे संघाचे सदस्यत्व दोन्ही संघाच्या क्रिकेट मंडळामध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे रद्द केले होते. नेपाळ क्रिकेट मंडळाला पुन्हा सदस्यत्व बहाल करताना काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. नेपाळचा मार्ग १७ सदस्यीय केंद्रीय कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर सुकर होण्यास मदत झाली.


Find out more: