राज्यातील पुरपरिस्थितीचा वैद्यकिय प्रवेश निश्‍चितीवर परिणाम झाला आहे. कारण आता वैद्यकिय प्रवेश निश्‍चितीमध्ये मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी जवळच्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्‍चित करू शकणार आहेत.

राज्याच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या ईमेलव्दारे प्राप्त मागणीनंतर पुरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीसाठी कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्‍चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा 2019 मुख्य पेपर हा राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. रविवार सकाळी हा पेपर घेण्यात आला होता तो पुढे ढकलून आता 24 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Find out more: