राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी यापूर्वी अर्ज न भरू शकलेले विद्यार्थी आणि यापूर्वीच अर्ज भरल्यानंतरही प्रवेश मिळाले नाहीत, असे विद्यार्थी पुन्हा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करू शकतील, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
शासकीय व खासगी आयटीआय प्रवेशप्रक्रियेची अंतिम मुदत अनुक्रमे दि. 16 सप्टेंबर 2019 आणि 30 सप्टेंबर 2019पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच खासगी आयटीआय संस्थांकडून त्यांच्या स्तरावर रिक्त असलेल्या जागा भरण्याची कार्यवाहीसाठी दि.
30 सप्टेंबरपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयने प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे.
अर्ज करणे व अर्ज निश्चितीसाठी मुदत : 5 ते 11 सप्टेंबरविद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी : 12 सप्टेंबरनावनोंदणी व संस्थांस्तरावर गुणवत्ता यादी : 13 सप्टेंबरनिवड यादी प्रसिद्ध करणे : 14 सप्टेंबर