खरतर आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या असल्या तरी बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण तुम्हांला माहित आहे का ? आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या किंवा फळे उपचारासाठी उपयोगी पडू शकतात. म्हणजे आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे लसूण. लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या रोजच्या जेवणात वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे लसूण. यातील विलक्षण गुणधर्मामुळे याला अमृता सारखं मानल गेलं आहे.
लसणाचे गुणधर्म :
- सर्दी, खोकला, दमा आणि इतर विकारांवर लसूण अत्यंत गुणकारी ठरतो.-
- जुनाट सर्दी किवा खोकला झाला असल्यास, दुधात लसणाच्या पाकळ्या उकळून ते दूध प्यावे.
- लसणाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून छातीवर लावल्यास डांग्या खोकला बरा होण्यास मदत होते.
- सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठीही लसूण गुणकारी आहे.
- लसूण, आवळ्याचा रस, भिजलेलं हिंग एकत्र करून दररोज घेतल्याने पोटावरील चरबी कमी होते.
- गाईच्या तुपात लसणाच्या पाकळ्या टाकून खाल्यास संधीवात बरा होतो.
प्रामुख्याने थंडीत आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात लसणाचा वापर करावा. लसूण हे एक औषध म्हणून काम करते. म्हणून दिवसात २-३ पाकळ्या नक्की खाव्यात.