वायू प्रदुषणापासून सुटका मिळवण्यासाठी नाशिक रेल्वे स्टेशनवर ‘ऑक्सिजन पार्लर’ सुरू करण्यात आले आहे. याद्वारे प्रवाशांना शुद्ध हवा मिळणार आहे. ही सेवा भारतीय रेल्वेच्या सहाय्याने एअरो गार्डने सुरू केली आहे. एअरो गार्डचे सह-संस्थापक अमित अमृतकर यांनी सांगितले की, ऑक्सिजन पार्लरची संकल्पना नॅशनल एरोनॉटित्स अँन्ड स्पेस एडिमिनिस्ट्रेशनच्या शिफारसीवर आधारित आहे.
त्यांनी सांगितले की, 1989 मध्ये नासाने एक रिसर्च केला होता. ज्यामध्ये त्यांनी काही झाडांबद्दल सांगितले होते, जे हवेतील 5 सर्वात हानिकारक प्रदुषक शोषूण घेतात. त्यातील अधिकतर झाडे येथे लावण्यात आलेली आहेत. ही झाडे आपल्या आजुबाजूच्या 10X10 फूट क्षेत्रातील हवा साफ करतात.
त्यांनी सांगितले की, येथे जवळपास 1500 झाडे आहेत. हे रेल्वे स्टेशनवर वायू प्रदुषण कमी करू शकतात. त्यांचा उद्देश प्रत्येक रेल्वे स्टेशनसोबतच प्रत्येक घरात असा उपक्रम सुरू व्हावा. लोक यातील झाडे मित्र अथवा कुटूंबाला भेट म्हणून देऊ शकतात.
रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनी देखील या उपक्रमाला एक सकारात्मक प्रयत्न असल्याचे म्हणत कौतूक केले.