![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/health/movies_news/corona-update-corona-infected-patients-are-estimated-at-181-in-the-state-73-in-mumbai5edeb124-9aff-4e74-add9-5655b216624e-415x250.jpg)
मुंबई : कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुण्यात एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असतांनाच राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 167 वरून 181 वर पोहचली आहे.
एकट्या मुंबईत 73 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील 181 रुग्णांपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दर तासाला वाढ होतांना दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले असता. काही नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडतांना दिसत आहे.