मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 537 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये एकूण 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आकडेवारीमध्ये दररोज वाढ होताना दिसतेय. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 306 वर पोहोचली आहे. खबरदारी म्हणून जिथेजिथे कोरोनाचे रुग्ण सापडले ते मुंबईतले जवळपास अडीचशे परिसर पूर्णपणे सील करण्यात आलेले आहेत.
यासोबतच लॉकडाऊन काटेकोरपणे पाळावा असे आवाहन प्रशासन आणि अनेक नेत्यांकडून सुद्धा करण्यात येत आहे. मात्र ही वाढती आकडेवारी पाहता कदाचित महाराष्ट्रातला लॉकडाऊन 14 तारखेला न संपता पुढे वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.
नव्यानं आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 28, ठाणे जिल्ह्यातील 15, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशामधील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे.
मुंबईत शुक्रवारपर्यंत 278 रुग्ण होते. आज त्यामध्ये आणखी 28 जणांची भर पडली आहे. त्यामुळं हा आकडा आता 306 झाला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 27 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.