मुंबई : कोरोना व्हायरसने राज्यात 1135 जण बाधित झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. आतापर्यंत 117 रुग्ण या आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यातील नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडायचे असल्यास तर मास्क वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे. त्यासाठी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
अगदी कॉटनच्या मास्कचा वापर केला तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. कोरोना व्हायरसबाबत अधिक खबरदारी म्हणू मोठमोठ्या शहरांमध्ये मोबाइल क्लिनिक्स उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल उभे करणार असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
https://mobile.twitter.com/rajeshtope11/status/1247931023205101568