मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात 92 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1,666 झाली आहे. राज्यातील आरोग्य विभागाने याविषयी माहिती दिली आहे.
गेल्या 12 तासांमध्ये नवीन 92 प्रकरण समोर आले आहे. यामध्ये मुंबईमध्ये 72, औरंगाबादमध्ये 2, मालेगावमध्ये 5, पनवेलमध्ये 2, केडीएमसीमध्ये 1, ठाणेमध्ये 4, पालघरमध्ये 1, नाशिकमध्ये 1, पुण्यात 1, अहमदनगरमध्ये 1 तर वसई-विरारमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान अकोल्यात एका कोरोना रुग्णाने स्वतःवर ब्लेडने वार केले आहे. या रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण पातूरच्या सात कोरोनाबाधित रूग्णांपैकी एक आहे. आजारपणाच्या वैफल्यातून पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रूग्णांच्या बेतालपणामूळे उपचार करणारे डाँक्टर, नर्स हैराण झाले आहेत.