कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. मात्र, या चिंता वाढवणाऱ्या वातावरणात एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. कल्याण पश्चिम येथील एका 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बाळ बरे होऊन आपल्या घरी आले आहे.


आज जिथे संपूर्ण देश या कोरोनाच्या विळख्यात आहे. तिथे एका सहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवून जेव्हा हे बाळ परत आपल्या घरी आलं तेव्हा शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत आसपासच्या सोयायटीमधील नागरिकांनी त्या बाळाचं स्वागत केलं.

 

याप्रसंगी बाळाची आई अत्यंत खुश होती. तिने बाळाचा हात वर करत सर्वाचे आभार मानले. यावेळी पोलीस, डॉक्टर आणि रुग्णावाहिका चालक यांच्यासाठीही नागरिकांनी टाळ्या वाजवल्या.


यावेळी मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई या देखील तिथे उपस्थित होत्या. बाळाची काळजी घेतली जाईल आणि तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा वेळोवेळी पाठवले जातील, असे कस्तुरी देसाई यांनी सांगितलं.

https://m.youtube.com/watch?v=YWi3gUvR1yo&feature=emb_title

Find out more: