पुणे : देशातील अनेक राज्यांमधील जवळपास महिनाभराच्या लॉकडाऊनंतरही कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्यामुळे केंद्रासह राज्यातील सरकारसमोर आव्हान निर्माण झाले असतानाच पुण्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूच्या गुणोत्तरात गेल्या तीन दिवसात घट झाली आहे.

 

पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होऊन रूग्ण कोरोनामुक्त होण्यात वाढ होत असल्याची महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे. पुण्यातील आकडेवारी पुढच्या दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय मृत्यू दरापेक्षा खाली येण्याचा विश्वासही शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्याचबरोबर जगातील सरासरीपेक्षा अधिक पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर असल्यामुळे प्रशासनासमोर हा मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी झाल्याने प्रशासनाचेही कौतुक करण्यात येत आहे.

Find out more: