
मुंबई : काल राज्यात 811 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्ण संख्या 7628 झाली आहे. तसेच काल 119 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1076 रुग्ण बरे झाले आहेत.
अजूनही एकूण 6229 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत.
तर 7628 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 393 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8,124 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान काल राज्यात 22 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता 323 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईत 13, पुणे महानगरपालिका क्षेत्रात 4 तर मालेगाव 1, पुणे ग्रामीणमध्ये 1, पिंपरी चिंचवडमध्ये 1, धुळे येथे 1 तर सोलापूर शहरात 1 मृत्यू झाला आहे.